मंदीचं सावट- Unacademy-Vedantu नंतर आता Byju ने ही 1100 लोकांना कामावरून काढलं

नवी दिल्ली, 1 जुलै 2022: जगभरातील मंदीच्या धोक्याचा फटका बहुतांश स्टार्टअप कंपन्यांना बसत आहे. भारतातील स्टार्टअप कंपन्या, विशेषत: एडटेक कंपन्या सातत्याने कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. ताजे प्रकरण Byjuचं आहे, जिथे एका झटक्यात 1,100 हून अधिक लोकांना फायर करण्यात आलं आहे. कंपनीने व्हाईटहॅट ज्युनियर आणि Topprमध्ये 500 पेक्षा कमी लोकांना कामावरून काढलं आहे असं म्हटलं असलं तरी, त्याच्या पीडितांचा असा दावा आहे की केवळ Topprमधूनच 1,100 लोकांना काढून टाकण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी अधिग्रहित केलं होतं Toppr

Byju ने गेल्या वर्षी जुलै मध्ये $150 दशलक्ष मध्ये Toppr विकत घेतलं. व्हाईटहॅट ज्युनियर ही देखील बायजू समूहाची कंपनी आहे. Toppr मधून अशावेळी लोकांना काढण्यात आलं आहे जेव्हा व्हाईटहॅट ज्युनियरने 300 कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यापूर्वी व्हाईटहॅट ज्युनियरने एप्रिल-मेमध्ये 250 कर्मचाऱ्यांचे राजीनामेही घेतले होते. बायजूच्या प्रवक्त्याने सांगितलं की, “आम्ही समूह कंपन्यांमधील संघांना दीर्घकालीन वाढीला गती देण्यासाठी आणि व्यवसायातील प्राधान्यक्रम पुन्हा समायोजित करण्यासाठी अनुकूल करत आहोत. या संपूर्ण प्रक्रियेत ग्रुप कंपन्यांमधील 500 हून कमी कर्मचारी प्रभावित झाले आहेत.

बडतर्फ कर्मचार्‍यांचा हा दावा

Toppr बद्दल सांगितलं जात आहे की कंपनीने सोमवारी पीडित कर्मचाऱ्यांना बोलावून राजीनामा देण्यास सांगितलं होतं. कंपनीने असंही म्हटलं होतं की जर कर्मचार्‍यांनी स्वत: राजीनामा दिला नाही तर त्यांना कोणत्याही नोटीस कालावधीशिवाय कामावरून काढलं जाईल. टॉपरमधून काढून टाकलेल्या एका कर्मचाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, ‘मी रसायनशास्त्र विषयाच्या तज्ञांच्या टीममध्ये होतो. माझ्या संपूर्ण टीमला काढून टाकण्यात आलंय. स्वयंनिवृत्त कर्मचाऱ्यांना एक महिन्याचं वेतन देण्याचं आश्वासन कंपनीने दिलं होतं. त्याचवेळी राजीनामा न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार न दिल्याचीही चर्चा होती. एकट्या टोप्परमधून सुमारे 1,100 लोकांना बाहेर काढण्यात आलंय.

ऑफलाइन वर्गांमुळं आव्हाने वाढली

तथापि, एजन्सीने टॉपरचे सह-संस्थापक झीशान हयात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. व्हाईटहॅट ज्युनियरच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता, हा निर्णय भविष्यातील वाढीबाबत आहे. Unacademy, Vedantu, Lido, Frontrow सारख्या स्टार्टअप एज्युटेक कंपन्यांनीही हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. वास्तविक, ऑफलाइन क्लासेस सुरू झाल्यानंतर ऑनलाइन अभ्यासाचा व्यवसाय मंदावला आहे. त्यामुळं एज्युटेक कंपन्यांना व्यवसायात अडचणी येत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा