नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2022: केंद्र सरकार गेल्या काही काळापासून सातत्यानं विनीवेशी करणावर भर देत आहे. या अंतर्गत सरकारने नुकतीच एअर इंडियाची विक्री केली. आता सरकार एअर इंडिया शी संबंधित आणखीन एका कंपनीची विक्री करणार आहे. एका अधिकाऱ्याने असं सांगितलं की, एअर इंडियाच्या ग्राउंड-हँडलिंग आर्म अलायन्स एअरच्या विक्रीवर सरकार काम सुरू करेल आणि पुढील आर्थिक वर्षात एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) येणं अपेक्षित आहे.
अधिकाऱ्याने पुढं सांगितलं की “एअर इंडियाच्या उपकंपन्या विकण्यासाठी आमच्याकडं आधीच मंत्रिमंडळाची मान्यता आहे. त्यामुळं आम्ही पुढील आर्थिक वर्षात ग्राउंड-हँडलिंग आर्मपैकी एकासाठी बोली आमंत्रित करणारी EoI घेऊन येऊ,”
सध्या एअर इंडियाच्या 4 उपकंपन्या Air India Air Transport Services Ltd (AIATSL), Airline Allied Services Ltd (AASL) or Alliance Air, Air India Engineering Services Ltd (AIESL) आणि Hotel Corporation of India Ltd (HCI) या एअर इंडिया असेट्स होल्डिंग लिमिटेड (AIAHL) सोबत आहेत. एअर इंडिया असेट्स होल्डिंग लिमिटेड (AIAHL) ही एक स्पेशल पर्पोज व्हेईकल (SPV) आहे जी 2019 मध्ये बनवण्यात आले होती. एअर इंडियाची नॉन-कोर असेट्स आणि कर्ज ठेवण्यासाठी या कंपनीला तयार करण्यात आलं होतं.
सरकारी मालमत्ता असलेली एअर इंडिया कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात चालू होती. गेल्या महिन्यात सरकारने या कंपनीची विक्री करण्यासाठी लावलेल्या बिडींग मध्ये ही कंपनी पुन्हा टाटा समूहाला विकली. त्यामुळं एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समूहाकडं आली आहे.
अधिकाऱ्याने पुढं सांगितलं की, एअर इंडियाच्या खाजगीकरणासाठी एअर इंडिया स्पेसिफिक अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम (AISAM) किंवा CPSE निर्गुंतवणुकीसाठी पर्यायी यंत्रणा या उपकंपन्यांचं खाजगीकरण करण्यासाठी निर्णय घेणारे मंत्री मंडळ असेल की नाही हे देखील ठरवायचे आहे.
AISAM चे नेतृत्व गृहमंत्री करतात आणि त्यात अर्थमंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री आणि नागरी विमान वाहतूक मंत्री यांचा समावेश होतो. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या निर्गुंतवणुकीच्या पर्यायी यंत्रणेमध्ये रस्ते वाहतूक मंत्री, अर्थमंत्री आणि वाणिज्य मंत्री यांचा समावेश होतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे