UAE नंतर आता या मुस्लिम देशात बांधलं जाणार हिंदू मंदिर

पुणे, 28 जून 2022: UAE नंतर, भव्य हिंदू मंदिर असणारा बहरीन हा मध्य पूर्वेतील दुसरा देश असेल. यावर चर्चा करण्यासाठी बहरीनचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान सलमान बिन हमाद अल खलिफा यांनी सौदी अरेबियातील BAPS हिंदू मंदिराच्या प्रमुखाची भेट घेतली.

अबुधाबी येथील हिंदू मंदिराचे प्रमुख पूज्य ब्रह्मविहारी स्वामी आणि BAPS स्वामीनारायण संस्थेच्या शिष्टमंडळाने मनामा येथील राजवाड्यात क्राउन प्रिंसची भेट घेतली.

बहरीन हा मध्य पूर्वेतील दुसरा देश आहे जिथं BAPS स्वामीनारायण संस्था पारंपारिक हिंदू मंदिर बांधणार आहे. बहरीन सरकारने मंदिराच्या बांधकामासाठी जमीन दान केली आहे.

ब्रह्मविहारी स्वामींनी युवराजांकडून मंदिराच्या बांधकामासाठी जमीन मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशही दिला, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी या ऐतिहासिक क्षणाचं स्वागत केलंय.

ही ऐतिहासिक भेट जमिनीच्या रूपात मिळाल्याबद्दल आम्ही बहरीनचे क्राउन प्रिन्स आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत, असं स्वामी म्हणाले. यावरून दोन्ही देशांमधील उबदार संबंध दिसून येतात.

BAPS मध्य पूर्व प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय समन्वयक स्वामी म्हणाले की, हे मंदिर सर्व धर्माच्या लोकांसाठी खुलं असेल. ज्यांना भारतीय परंपरा जाणून घ्यायच्या आहेत आणि समजून घ्यायच्या आहेत त्यांचं येथे स्वागत आहे.

ते म्हणाले, BAPS स्वामीनारायण मंदिराचे बांधकाम हा हिंदू धर्मासाठी ऐतिहासिक क्षण आहे. भारत आणि बहरीन यांच्यातील संबंधांसाठीही हे विशेष आहे. एकत्रितपणे, आंतरराष्ट्रीय सौहार्दासाठी ते महत्त्वाचे आहे.

अबुधाबी, UAE मध्ये पहिल्या हिंदू मंदिराचे बांधकाम सुरू आहे. नुकतेच मंदिराची पायाभरणी झाली. हे मंदिर फेब्रुवारी 2024 मध्ये लोकांसाठी खुलं होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा