वेदांता फॉक्सकॉन नंतर दुसरा मोठा प्रकल्प गुजरातला

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२२ : राज्यात मागील काही दिवसापूर्वी वेदांता फॉक्सकॉनवरून आरोप प्रत्यारोपाचा धुरळा उडाला होता. ते शांत होत नाही तोच आता आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचं समोर आले आहे. टाटा आणि एअरबस या कंपनीचा प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. भारतीय हवाईदलासाठी C295 वाहतूक विमान बनवण्याची जबाबदारी टाटा एअरबसकडे देण्यात आली आहे.

टाटा एअरबस कंपनी या विमानांची निर्मिती गुजरात मधील बडोदा येथील प्लांटमध्ये करणार आहे. ३० ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते C295 वाहतूक विमान निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत.

वेदांता फॉक्सकॉन पाठोपाठ हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाविकासआघाडीकडून टीका करण्यात आली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातुन जाणे म्हणजे गुजरातने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आला आहे.

तर टाटा एअरबसचा प्रकल्प वर्षभरापूर्वीच गुजरातला गेला आहे. महाविकासआघाडीकडून आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

काय आहे C-295 प्रकल्प?

५६ विमानांच्या निर्मितीसाठी करार

२१ हजार कोटींचा सामंजस्य करार

AVRO-748 ची जागा C-295 विमानं घेणार

भारत सरकार आणि एअरबसमध्ये करार

पहिली १६ विमानं पुढच्या ४ वर्षांमध्ये मिळणार

४० विमानांची निर्मिती करणार

टाटा ऍडव्हान्स सिस्टीम निर्मिती करणार

एअरबस युरोपमधील विमान निर्मिती कंपनी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांत फॉक्सकॉनमधून बाहेर पडल्यानंतर सी-२९५ मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल असे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र आता एकनाथ शिंदे सर्वांसमोर उघडे पडले आहेत. महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच भाजपने शिंदेंना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे. हा प्रकल्प बाहेर गेल्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीही लिज ट्रस यांच्याप्रमाणे राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा