निर्भया प्रकरणातील एक दोषीची माजी वकीलाविरोधात याचिका

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींचे नवे डेथ वाॅरंट जारी करण्यात आलेले आहेत. त्या चौघांना आता २० मार्च रोजी फासावर चढवण्यात येणार आहे. मात्र यातील एक दोषी मुकेश सिंह याने फाशी टाळण्यासाठी एक माजी वकील वृंदा ग्रोव्हार यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. या याचिकेत वृंदा ग्रोव्हर यांनी आपला विश्वासघात केला असल्याचे म्हटले आहे.

याबाबत एक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याचे वकीलपत्र आधी वृंदा ग्रोव्हर यांच्याकडे होते. मुकेश याने ग्रोव्हर यांच्याविरोधात दाखल केलेल्या आताच्या याचिकेनुसार, वृंदा ग्रोव्हर यांनी आपल्यावर दबाव टाकून क्युरेटिव्ह याचिका लवकर दाखल केली. ही याचिका दाखल करण्यासाठी त्याच्याकडे खूप वेळ शिल्लक होता. त्यामुळे त्याला क्युरेटिव्ह याचिका आणि दया याचिका दाखल करण्याची संधी जुलै २०२१ पर्यंत मिळायला हवी. वृंदा यांच्याविरोधात मुकेश याचा विश्वासघात करणे तसेच षडयंत्र रचणे या गुह्यासाठी खटला चालवला जावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
ही याचिका मुकेशचे सध्याचे वकील मनोहर लाल शर्मा यांनी दाखल केली आहे. या याचिकेकर ९ मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा