फ्रेंच राष्ट्रपतींच्या निषेधार्थ भोपाळमध्ये आंदोलन, शिवराज सरकारची कारवाई

भोपाळ, ३० ऑक्टोबर २०२०: फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉनविरूद्ध जगभरात निदर्शने होत आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर अध्यक्ष मॅक्रॉन यांनी केलेल्या टीकेविरोधात भोपाळमध्ये गुरुवारी शेकडो लोक रस्त्यावर उतरले आणि निदर्शनं केली. या निदर्शनास शिवराज सरकार यांनी कारवाईची तयारी दर्शविली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेश म्हणजे शांततेचे प्रतीक असलेले बेट असल्याचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट केलं आहे. ‘जे लोक मध्यप्रदेश मधील शांततेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू. या प्रकरणात १८८ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे. या प्रकरणात कोणालाही दुर्लक्षित केलं जाणार नाही मग तो कोणीही असो.’

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीका करताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ‘कमलनाथ म्हणत आहेत की ते बे-डाग आहेत. परंतु, वास्तवात त्यांची प्रतिमा भयंकर मलीन आहे. पडद्यामागचा चेहराही वेगळा आहे. त्यांची प्रतिमा इतकी मलिन आहे की जगभरातील वॉशिंग पावडर जरी वापरली तरी त्यांचे डाग धुतले जाणार नाहीत. त्यामुळं कमलनाथ जी आपण स्वतःला बे-दाग म्हणणं सोडून द्या.’

इकबाल मैदानात आंदोलन

भोपाळच्या इक्बाल मैदानावर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉनच्या विरोधात हजारो लोक जमा झाले. भोपाळ सेंट्रलचे काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी हा निषेध आयोजित केला होता. निषेधावर पोहोचलेल्या लोकांनी त्यांच्या हातात फलक लावले आणि फ्रान्सच्या अध्यक्षांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या निदर्शनावर पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा