काठमांडू, १६ सप्टेंबर २०२२: नेपाळ २० नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात गोरखा सैनिकांच्या भरतीवर निर्णय घेईल, असे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. भारतीय सैन्यात अल्पकालीन भरती योजनेअंतर्गत गोरखांची भरती २४ ऑगस्ट पासून सुरू होणार होती. मात्र, नेपाळच्या विनंतीवरून ते स्थगित करण्यात आली. नेपाळ भारतीय सैन्यात गोरखा सैनिकांच्या भरती संबंधित विषयावर भारतीय अधिकाऱ्यांशी त्वरित चर्चा करणार नाही.
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवानानुसार नेपाळने कट ऑफ तरखा चुकवल्यास रिक्त पदांचे इतर ठिकाणी पुनवितरण करावे लागेल. सरकारने वेळेवर निर्णय न घेतल्यास नेपाळमधून भरती करण्यापासून भारताला माघार घ्यावी लागेल, असे भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितल्यानंतर नेपाळच्या मंत्रालयाचे विधान आले आहे.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या सेपा लमसाल यांनी काठमांडू, येथे पत्रकार परिषदेत सांगितले की भारतीय सैन्य दलात अल्पकालीन भरतीची योजनेवर त्वरित निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. आता, नेपाळ सरकारच्या निवेदनानुसार पुढील सरकार स्थापनेला अजून दोन महिने बाकी असल्याने यावर्षी नेपाळमधून भरती होण्याची शक्यता नाही. जनरल पांडे यांनी गेल्या आठवड्यात नेपाळला भेट दिली आणि त्यांच्या समक्षांशी व्यापक चर्चा केली
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड