गोल पोस्ट राष्ट्रीय बीकानेर मध्ये अग्नी तांडव

बीकानेर मध्ये अग्नी तांडव

बीकानेर (राजस्थान ),२३ ऑगस्ट २०२०: रामप्रताप गोदाराच्या राष्ट्रीय राजमार्ग ६२ वर शनिवारी मध्य रात्री ओव्हरटेक करण्याच्या नादात गॅस सिलेंडर ने भरलेल्या ट्रक ने दुसऱ्या दोन ट्रकला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही ट्रकनी पेट घेतला, सुदैवाने गॅसच्या ट्रकला आग न लागल्या मुळे मोठा अपघात टळला, या अपघातात विटेच्या ट्रक व पीओपी ट्रक चे मोठे नुकशान झाले.

दोन्ही ट्रक ने पेट घेतल्या मुले हायवे वर वाहतुकीची कोंडी झाली होती, लूणकरणसर पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच तातडीने तिथे पोहोचून महामार्ग पूर्ण पणे ४५ मिनिटांसाठी ब्लॉक करून ठेवले, या दरम्यान अग्निशामक दलाचे ३ गाड्यानी आगी वर नियंत्रण मिळवले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: संदीप राऊत

error: Content is protected !!
Exit mobile version