आग्रा : धर्मशाळा येथे खोदकामादरम्यान तीन घरे आणि मंदिर कोसळले

आग्रा, २६ जानेवारी २०२३ :आग्रा सिटी स्टेशन रोडवर असलेल्या धर्मशाला येथे गुरुवारी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. धर्मशाळेत सुरू असलेल्या खोदकामामुळे तीन घरे आणि मंदिर कोसळून पडले आहे. घरात उपस्थित असलेले तीन जण घराखाली गाडले गेले.

प्रभारी निरीक्षक अरविंद कुमार यांनी सांगितले की, ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. धर्मशाळेच्या तळघरात खोदकाम सुरू होते, त्यामुळे घरे कोसळली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्य सुरु आहे. यामध्ये तीन जण गाडले गेल्याचे आढळून आले होते. त्यांची सुटका करण्यात आली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे.

पोलीस आयुक्त डॉ. प्रितिंदर सिंह यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी ढिगारा हटवल्यानंतर गाडलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये ३ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात कोणतीही जीवितहानी नाही. मात्र, एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा