मनसेच्या निवेदनानंतर पुण्यातील अग्रसेन शाळेने परीक्षा केल्या रद्द….!

पुणे, दि. ३१ जुलै २०२० रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अग्रसेन हायस्कूलने आज शुक्रवारी होणारी नियोजित परीक्षा रद्द केली आहे. मनसेच्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. परीक्षा न घेण्याबाबत काही पालकांनी गुरुवारी दि. ३० रोजी मनसेच्या महिला सेनेच्या शहराध्यक्षा रूपाली पाटील व वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती

या तक्रारीची दखल घेत मनसेचे गणेश पाटील, मनसे महिला सेना विभाग अध्यक्ष वंदना साळवी, मनवीसेचे विभाग अध्यक्ष कुलदीप घोडके, मनसेचे सदस्य सुनील कदम, किशोर चिंतामणी, महेश शिंदे, राम पाटील आदी मनसे पदाधिकारी व पालक प्रतिनिधी, पोलीस अधिकार, यांनी शाळा प्राशासनाशी मनसे स्टाईल चर्चा केली त्यानंतर शाळा प्रशासनाकडे पुढील ५ दिवस होणाऱ्या परीक्षा रद्द करा, अशी मागणी केली.

या मागणीचा तात्काळ विचार करून शाळा प्रशासनाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शहरपक्ष पदाधिकारी यांच्या नावे लेखी पत्र दिले. यात परीक्षा रद्द करून ऑनलाईन परीक्षा घेऊ असे लेखी आश्वासन दिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा