मंगळावर शेती आणि नवी सृष्टी होणार …

पुणे, २६ ऑगस्ट २०२२ : काही काळापूर्वी द मार्स नावाचा चित्रपट अस्तित्वात आला होता. ज्यात त्यांनी मंगळावर एका माणसाने जीवसृष्टी वसवल्याचं दाखवलं होतं. ते आता शास्त्रज्ञांनी वास्तवात आणलं आहे. मंगळावर लवकरच मानव जाण्याच्या आणि वस्ती करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यानंतर आता मानवाने एक पाऊल पुढे टाकत मंगळावर शेती करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. मंगळावर सर्वात जास्त क्षारयुक्त पाणी आहे. ज्यामुळे शेती होणं आणि टिकणं कठीण आहे. तिथल्या धूळ आणि मातीमध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. याशिवाय, तिथली माती मीठ आणि खनिजांनी भरलेली आहे, ज्यामुळे तेथे बहुतेक झाडं जगणे कठीण होईल. मंगळाच्या मातीत कमी पौष्टिकता आहे आणि त्याचवेळी जास्त क्षारयुक्त पाणी असल्याने ते पीक घेण्यास अयोग्य ठरते.

मंगळावर पोहोचण्यासाठी काही महिने लागतील आणि अशा परिस्थितीत इतक्या वेळासाठी पृथ्वीवरुन अन्न घेऊन जाणं शक्य होणार नाही. एका नवीन अभ्यासानुसार शास्त्रज्ञांनी असं एक रोप शोधलं आहे, जे मंगळ ग्रहावर सर्वप्रथम पिकवले पाहिजे, असा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे.

नासा या दिशेने गंभीररित्या संशोधन आणि प्रयोग करत आहे. मंगळावरच्या नवीन अभ्यासात, एल्फाल्फा वनस्पतींमध्ये याचा उपाय शोधण्यात आला आहे. मंगळावरील ज्वालामुखीच्या कणखर जमिनीतही अन्न प्रदान करणारे हे पीक वाढू शकेल, असे संशोधकांना आढळून आले आहे. इतकंच नाही तर यानंतर याचा वापर सलगम, मुळा आणि सलाड पानं उगवण्यासाठी खत म्हणून करता येईल. सलगम, मुळा आणि सलाडसाठी वापरण्यात येणारे पालेभाजी या वनस्पती मंगळाच्या सिम्युलेटेड मातीमध्ये वाढू शकतात आणि त्यांना जास्त पाणी आणि जास्त देखभाल करण्याचीही आवश्यकता नाही.

पण या सगळ्यात एक अडचण अशी आहे की त्यांना वाढण्यासाठी स्वच्छ पाणी लागेल. परंतु संशोधकांना वाटते की मंगळावर उपलब्ध असलेल्या खारट पाण्यावर एका प्रकारच्या समुद्री जीवाणुंकडून प्रक्रिया केली जाऊ शकते आणि ज्वालामुखीच्या खडकांमधून फिल्टर करून पिकांसाठी शुद्ध पाणी तयार केले जाऊ शकते.

मात्र जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर आता चंद्राप्रमाणेच मंगळावरही मानवाचे पाऊल पडेल. आणि दुसरी पृथ्वी मंगळावर वसवली जाईल आणि एका नवीन सृष्टीचा जन्म होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा