कृषीदूतांनी शेतकऱ्यांना दिले कृषी क्षेत्राचे धडे..

24

बारामती, ६ ऑक्टोंबर २०२०: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संलग्न श्री विश्वेश्वर विद्याविकास संस्था संचलित दहिगाव (ता. वैजापूर) येथील दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी सोमवार दि. ५ रोजी तांदूळवाडी (ता. बारामती) येथील शेतकऱ्यांना कृषिक्षेत्राविषयक धडे दिले. विद्यालयाचे विद्यार्थी अजित नितिन वायसे याच्यासह कृषीदूतांनी ग्रामीण जागृकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्ग शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके दाखविली.

यामध्ये मातीपरीक्षणाचे महत्त्व, माती नमूना संकलनाची शास्त्रीय पद्धत, आधुनिक मोबाईल तंत्रज्ञानाचा शेतीत योग्य वापर, एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन, जैविक शेती तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया, बीजप्रक्रिया, फळबाग लागवडी आदीचा समावेश होता.

या सगळ्या गोष्टींचा योग्य वापर केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते असं सांगण्यात आलं. कार्यक्रमासाठी कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. बैनाडे, उपप्राचार्य डॉ. बी. एम. जोशी यांच्यासह प्राध्यपकांचे मार्गदर्शन लाभले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव