पुणे,१३ ऑगस्ट २०२४ -: रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न, महाडच्या श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कृषी महाविद्यालय आचळोली येथील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषीदुतांनी शिरवली गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2024-25 अंतर्गत कृषी माहिती केंद्र आणि रानभाज्या प्रदर्शन घेण्यात आले.
विविध शेती उपयोगी अवजारे विविध रानभाज्या आणि त्यांचे आरोग्यदायी गुणधर्म पिकांवर पडणारे रोग त्यांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन, कीटकनाशके, बुरशीनाशके फवारणीसाठी घ्यायचे प्रमाण आणि वापरताना घ्यायची काळजी तसेच गाय,म्हैस आणि शेळ्या यांच्या विविध जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये, भात पिकाच्या व फळ पिकांची विविध जाती व त्यांची वैशिष्ट्ये वेलवर्गीय भाज्यांची माहिती याविषयी कृषी माहिती केंद्रमार्फत कृषीदूतांकडून शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाडचे तहसीलदार महेश शितोळे,माजी सभापती सिताराम कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार महेश शितोळे यांनी शेती करताना शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करायला हवा असे मत व्यक्त केले.कृषी महाविद्यालय आचळोलीचे प्राचार्य डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर,कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा. वि. आर. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालयाचे कृषी दूत सुयश भोसले, ऋषिकेश पवार, रंजीत जगताप ,प्रतीक जगताप, निखिल शेंडे ,मंगेश गलांडे ,प्रसन्नजीत खोमणे, प्रमोद शितोळे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.या प्रदर्शनास गावातील असंख्य शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कृषीदूतांचे आभार मानले.
कार्यक्रमाला गावचे सरपंच गणेश पवार, ग्रामसेविका सौ.विशाखा सोंडकर,तलाठी संदीप नवघरे,पोलीस पाटील स्वप्निल सपकाळ, तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम पवार, माजी सरपंच यासीन पेडेकर, माजी उपसरपंच संतोष कासारे आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : – अनिल खळदकर