फलटण, सातारा २१ ऑक्टोबर २०२३ : बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी वरदान ठरलेला एक वर्ष मुदतीचा सी.सी.एम.पी. हा अभ्यासक्रम सुरू केला असून हा कोर्स होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी वरदान ठरणार आहे. या वर्षीपासूनच हा सीसीएमपी कोर्स सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून या विद्यालयांमध्ये होमिओपॅथिक मध्ये वरदान ठरलेला एक वर्ष मुदतीचा सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्नॉकॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी प्रशासकीय पातळीवरती प्रयत्न करून या कोर्सला मान्यता मिळवून दिलीय. या कोर्सला मान्यता मिळवण्यासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत मस्के, उप-अधिष्ठाता डॉक्टर अंजली शेटे, फर्मकॉलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर राजेश हिरे, प्राध्यापक डॉक्टर राम भोसले यांनी प्रयत्न केले.
या कोर्सला मान्यता मिळवण्यासाठी होमिओपॅथिक क्षेत्रातील तज्ञांनी पाठपुरावा केला होता. हा पाठपुरावा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक मुसळे साहेब यांच्याकडे बारामती होमिओपॅथिक कौन्सिलचे माजी अध्यक्ष डॉक्टर बाहुबली शहा, होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर नंदकुमार झांबरे, डॉक्टर नीलकुमार श्रीखंडे, सचिव डॉक्टर राकेश मेहता यांनी सतत पाठपुरावा केला. बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा कोर्स सुरू झाल्याने विद्यार्थी व वैद्यकीय क्षेत्रामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार