वॉशिंग्टन, २१ जुलै २०२३ : सध्याचे जग हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे. अनेक क्षेत्रांमध्ये विविध कामांसाठी ‘एआय’चा वापर सुरू आहे. ‘गुगल’ आता बातम्या- लेख लिहिण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सचा वापर करत आहे. या साधनांचा वापर पत्रकारांनी आपल्या दैनंदिन कामात करावा, यासाठी वृत्त संस्थांशी चर्चादेखील करत आहे.
‘गुगल’कडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. गुगलने वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल आणि न्यूयॉर्क टाईम्ससह इतरांशी चर्चा केली आहे. हि ‘एआय’ साधने पत्रकारांना हेडलाईन्स किंवा वेगळ्या प्रकारच्या लेखन शैलीसाठी विविध पर्याय देऊन मदत करु शकेल. यातून पत्रकारांच्या कामातील उत्पादकता वाढेल असे सांगण्यात आले.
आम्ही विविध कल्पना शोधण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. पत्रकारांना त्यांच्या लेखांचे अहवाल तयार करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने ही साधने मदत करतील. असे असले तरी बातमीतील ‘रिपोर्टींग’ व फॅक्ट हा पत्रकारितेचा मूळ गाभा हे एआय टूल्स बदलू शकत नाहीत. ते पत्रकारांना स्वतःच करावे लागणार आहे. अशी माहिती गुगलच्या प्रवक्त्याने दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर