पाच वर्षात एक लाख उद्योग निर्मितीचे उद्धिष्ट

6
बारामती ३१ जानेवारी २०२१: राज्यात महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले याकाळात चक्रीवादळ,अतिवृष्टी,कोरोना सारख्या मोठया संकटांचा सामना सरकारला करावा लागला कितीही नुकसान सहन करावे लागले तरी चालेल राज्यातील प्रत्येक नागरिकाचा जीव महत्वाचा असल्याची सरकारची भावना असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझा व्यवसाय माझा हक्क योजनेचा शुभारंभ,मोबाईल व्हॅन हस्तांतरण तसेच कोविडच्या बिकट काळात काम केलेल्या
डॉक्टर,पालिकेचे कर्मचारी,आशा वर्कर्स या कोरोना योध्यांचा सन्मान रविवारी (दि.३१) रोजी ग.दि.मा सभागृहात पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
एमआयडीसी ग.दि.मा सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे,आमदार अशोक पवार,आमदार अतुल बेनके,सभापती निता बारवकर,नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे,जेअष्ट नगरसेवक किरण गुजर गटनेते सचिन सातव,उपनगराध्यक्ष तरन्नुम सय्यद,यावेळी उपस्थित होते.यावेळी पवार म्हणाले स्वयंरोजगार माध्यमातून नवउद्योजक म्हणुन स्वतःच्या पायावर उभे राहावे पाच वर्षात एक लाख तरुणांना रोजगार देण्याचा उद्देश आहे.७ वी पास ला १० लाख तर १० वी पास तरुणांना २५ लाखापर्यंत एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला कर्ज मिळणार आहे.तरुणांना उत्पादक सेवा,वाहतूक,फिरते विक्री केंद्र, शेती पूरक व्यवसाय केल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला गती मिळेल तालुका व शहरातील तरुणांना संधी आहे.आपले नाव नोंदवावे असे पवार म्हणाले कोरोना काळात पंतप्रधानांनी सी एस आर फंड केंद्राकडे जमा करावा असे सांगितल्याने राज्याला याचा फटका बसला आहे.कोरोना योध्यांच्या सन्मान हा योग्य असुन येणाऱ्या बजेट मध्ये राज्यातील बेरोजगारांना जास्तीत जास्त फंड देणार असुन राज्यातील २८८ मतदार संघांपैकी एक नंबर बारामतीचा असेल असे यावेळी म्हणाले तर शहरात व्यवसाय करताना शहर विद्रुपीकरण होऊ नये याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.तर विकासासाठी नुसते पैसे देत नाहीतर दर्जेदार काम होते का याकडे देखील लक्ष असल्याचे पवार म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा