विमानतळासाठी वातानुकूलित बससेवा सूरू

पूणे, २३ ऑक्टोबर २०२०: कोथरूड, स्वारगेट, हिंजवडी, हडपसर व निगडी येथून विमानतळावर जाण्यासाठी खास वातानुकूलित बससेवेचा शुभारंभ आज गिरीष बापट यांचा हस्ते झाला.

पीएमपीएल व्यवस्थापनाने ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. जलद, स्वस्त व वातानुकूलित स्मार्ट एअरपोर्ट बस अशी या सेवेची संकल्पना आहे. प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले. व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्याकडे गिरीष बापट या सेवेसाठी आग्रह धरला होता. पीएमपीएलने स्मार्ट सिटीमधील उपलब्ध निधी व मागील वर्षी पीएमपीएलमध्ये दाखल झालेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रीक बस यांचा वापर करून लोहगाव विमानतळ येथून ही सेवा सुरू केली आहे.

यापूर्वी दोन वेळा अशा प्रकारची सेवा सुरू झाली होती. त्यासेवेतील त्रुटी- उणिवा दूर करून नव्याने ही सेवा सुरू झाली. विमानतळावरील आगमन परिसरानजिक या बसेसचा थांबा आहे. या सेवेच्या वेळापत्रकाची इत्यंभूत माहिती सूचना फलकाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दर तीस मिनिटाला बस उपलब्ध असेल. ही सेवा पूर्ण वातानुकूलित असली तरी यामध्ये बस कुठे व कोणत्या वेळेला आहे ही माहिती प्रवाशांना मिळण्याकरिता ॲपची सुविधा करण्यात आली आहे. प्रवाशांच्या वाढणाऱ्या संख्येप्रमाणे बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे. अशी माहिती गिरीष बापट यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, विमानतळ प्राधिकरण सल्लागार समितीचे सदस्य उज्वल केसकर, कवी बादशाह सय्यद, अनिल पाटील, संचालक कुलदीप सिंग, पीएमपीएलचे सीएमडी राजेंद्र जगताप, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा