नवी दिल्ली: भारतातील एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम यांची लवकरच विक्री होणार आहे. त्यासंदर्भात लवकरच विक्रीबाबतच धोरण सरकारकडून स्पष्ट करण्यात येणार आहे. अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सीतारमण यांनी ही माहिती दिली. यावेळी सितारमन म्हणाल्या की, आपल्याला आर्थिक मंदीतून बाहेर येण्याकरता काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे. आतापर्यंत अनेक पावले उचलली गेली आहेत.
या दोन कंपन्यांच्या विक्रीमुळे एक लाख कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. त्यामुळे मार्चपर्यंत या कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
एअर इंडियासाठी विक्री प्रस्ताव गेल्यावर्षीच निश्चित झाला होता. मात्र, गुंतवणूकदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता. यावर्षी या प्रक्रियेसाठी गुंतवणूकदारांनीच उत्साह दाखवला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.