नवी दिल्ली, 2 ऑक्टोंबर 2021: सरकारी विमान कंपनी एअर इंडिया टाटा समूहाच्या नियंत्रणाखाली जात असल्याच्या बातम्या आज माध्यमांमध्ये सूत्रांच्या हवाल्यानं चालू आहेत. पण या दरम्यान, सरकार म्हणालं की अद्याप यावर निर्णय झाला नाही आणि जेव्हा होईल तेव्हा माहिती दिली जाईल.
टाटा ग्रुप आणि स्पाइसजेटचे अजय सिंग यांनी एअर इंडियासाठी बोली लावली होती. ही दुसरी वेळ आहे जेव्हा सरकार एअर इंडियामधील आपला हिस्सा विकण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी 2018 मध्ये सरकारने कंपनीतील 76 टक्के हिस्सा विकण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
सरकार काय म्हणालं
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागा च्या सचिवांनी (डीआयपीएएम) ट्वीट केलं की, “सरकारने एअर इंडियाच्या फाइनेंशियल बिडला मान्यता दिल्याच्या अशा मीडिया बातम्या चुकीच्या आहेत. सरकार जेव्हा हा निर्णय घेईल तेव्हा माध्यमांना माहिती दिली जाईल.
डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाची निर्गुंतवणूक प्रक्रिया डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होईल. सरकारने एअर इंडियासाठी आर्थिक निविदा मागवल्या होत्या. हा सरकारच्या निर्गुंतवणूक कार्यक्रमाचाही एक भाग आहे. सरकार एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसमधील आपला 100 टक्के हिस्सा विकणार आहे, तर ग्राउंड हँडलिंग कंपनी AISATS मध्ये 50 टक्के हिस्सा विकणार आहे.
टाटा समूहानेच केली होती सुरुवात
एअर इंडियाची सुरुवात 1932 मध्ये टाटा समूहानेच केली होती. टाटा समूहाचे जे. आर. डी. टाटा यांनी याची सुरुवात केली होती, ते स्वतः एक अतिशय कुशल पायलटही होते.
एअर इंडिया अशी सरकारी कंपनी बनली
दुसऱ्या महायुद्धानंतर, सामान्य हवाई सेवा भारतापासून सुरू झाली आणि नंतर त्याचं नाव एअर इंडिया ठेवण्यात आलं आणि ती सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बनवली गेली. वर्ष 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय विमानसेवेची गरज जाणवली आणि भारत सरकारने एअर इंडियामध्ये 49% हिस्सा विकत घेतला. यानंतर, 1953 मध्ये, भारत सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि टाटा समूहाकडून कंपनीतील बहुसंख्य भाग खरेदी केला. अशा प्रकारे एअर इंडिया पूर्णपणे सरकारी कंपनी बनली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे