माझी वसुंधरा अभियानांतर्गत बारामतीत वायू गुणवत्‍ता परिक्षण

बारामती, २३ जानेवारी २०२१: पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्‍ट्र शासन यांचे व्‍दारा निसर्गाशी असलेली कटीबध्‍दता निश्चित करण्‍यासाठी पृथ्‍वी, वायू, जल, अग्नि आणि आकाश या पंचतत्‍वावर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्‍यात येत आहे.
वातावरणातील वायू या घटकाची तपासणी करता यावी यासाठी बारामती शहराची वायू गुणवत्‍ता तपासणी करीता बारामती शहरात रहिवासी क्षेत्र (सहयोग सोसायटी) , वाणिज्यिक क्षेत्र (बारामती शहर बसस्‍थानक) तसेच औद्योगिक क्षेत्र (एम आय डी सी ) या ठिकाणी दिनांक २१ जानेवारी सायंकाळ पासून दिनांक २२ जानेवारी पर्यंत सलग २४ तास वायू गुणवत्‍ता परिक्षण करण्‍यात आल्‍याचे नगरपरिषदेच्या उपमुख्‍याधिकारी पद्मश्री दाईंगडे यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा