प्रजासत्ताक दिनामुळे एअरस्पेस निर्बंध; एअर इंडिया काही देशांतर्गत उड्डाणे रद्द करणार

47

नवी दिल्ली, १४ जानेवारी २०२३ : टाटा समूहाच्या मालकीच्या ‘एअर इंडिया’ने शुक्रवारी सांगितले, की ते राष्ट्रीय राजधानीतील हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे या महिन्यात काही देशांतर्गत उड्डाणे रद्द करतील आणि काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा शेड्युल करणार आहेत. दुसरीकडे, ‘इंडिगो’ने म्हटले आहे, की ता.१४ जानेवारीला त्यांच्या सर्व सिस्टीम अपडेट झाल्यामुळे त्यांची वेबसाइट, ॲप आणि कॉल सेंटर सेवा सुमारे सहा तास प्रभावित होतील. एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, भारतीय वायुसेनेच्या प्रजासत्ताक दिनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, ७४ व्या प्रजासत्ताक दिनापर्यंत एका आठवड्यासाठी हवाई क्षेत्र दररोज सुमारे तीन तासांसाठी प्रतिबंधित केले जाईल. ता. १९ ते२४ जानेवारी आणि ता. २६ जानेवारीच्या सकाळच्या तासांसाठी एअरमनला नोटीस जारी करण्यात आली आहे.

जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की लंडन, डलेस, नेवार्क, काठमांडू आणि बँकॉक या पाच स्थानकांवरून होणार्‍या आंतरराष्ट्रीय उड्डाण संचालनावर परिणाम होणार आहे. या कालावधीत कोणतेही आंतरराष्ट्रीय उड्डाण ऑपरेशन रद्द करण्यात आलेले नाही.

दुसरीकडे, देशातील सर्वांत मोठी एअरलाइन ‘इंडिगो’ने ता. १४ जानेवारी रोजी सर्व यंत्रणा अपडेट केल्यामुळे वेबसाइट, ॲप आणि कॉल सेंटरच्या सेवा सुमारे सहा तास प्रभावित झाल्या होत्या. ‘इंडिगो’च्या ताफ्यात ३०० विमाने आहेत. कंपनी १०२ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांना जोडणारी १,६०० हून अधिक दैनंदिन उड्डाणे चालवते. एअरलाइनने जारी केलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे, की, ”आमच्या सर्व सिस्टीम ता. १४ जानेवारी २०२३ रोजी अपडेट केल्या जातील. यामुळे रात्री १२.३० ते सकाळी ६.३० (भारतीय वेळेनुसार) आमच्या वेबसाइट, ॲप आणि कॉल सेंटर सेवा प्रभावित होतील. यासंदर्भात शुक्रवारी ग्राहकांना पाठविलेल्या नोटीसमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड