एअरटेल आणणार JioPhone पेक्षा स्वस्त फोन? Google सह भागीदारी

पुणे, 29 जानेवारी 2022: गुगल त्यांच्या कंपनीत एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची माहिती भारती एअरटेलने दिलीय. ही गुंतवणूक बहु-वर्षीय करारांतर्गत असेल, जी भारताच्या डिजिटल इकोसिस्टमला पुढे नेईल. एअरटेलने रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये म्हटलंय की, ‘भागीदारीचा एक भाग म्हणून गुगल पुढील 5 वर्षांत त्यांच्या कंपनीमध्ये $1 बिलियन (सुमारे 7400 कोटी) गुंतवणूक करेल.’

या भागीदारी अंतर्गत, कंपनी आपला फोन Jio च्या स्वस्त स्मार्टफोन Jio Phone Next शी स्पर्धा करण्यासाठी तयार करू शकते. एअरटेलने सांगितलं की, “भागीदारीचा फोकस विविध किमती श्रेणींमध्ये परवडणारे स्मार्टफोन प्रदान करण्यावर असंल.” यासोबतच कंपनी या भागीदारीअंतर्गत 5G, क्लाउड इकोसिस्टमवरही काम करंल.

कंपनीने सांगितलं की या भागीदारीअंतर्गत एअरटेल आणि गुगल परवडणारे अँड्रॉइड स्मार्टफोन बनवतील. दोन्ही कंपन्यांना इतर उपकरण निर्मात्यांसोबत एकत्र काम करण्याच्या संधी दिसतील, ज्यामुळं समान किंमत श्रेणीमध्ये स्मार्टफोन खरेदी करणं सोपं होईल.

या डील अंतर्गत कंपनी एअरटेलमधील 1.28% स्टेक 734 रुपये दरानं खरेदी करंल. एअरटेल अशा प्रकारे जिओला टक्कर देण्याची तयारी करत आहे. जिओने यापूर्वीच गुगल आणि क्वालकॉमसोबत भागीदारी केली आहे.

कंपनीने या दोन ब्रँड्सच्या सहकार्याने गेल्या वर्षी JIo Phone Next लॉन्च केलाय. या स्मार्टफोनचा फोकस कमी बजेट वापरकर्ते आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आपला परवडणारा स्मार्टफोन लॉन्च करू शकते.

Google आणि Alphabet चे CEO सुंदर पिचाई म्हणाले, ‘भारताचे डिजिटल भविष्य घडवण्यात एअरटेलचा मोठा हात आहे. आम्हाला या भागीदारीचा अभिमान आहे. आम्ही कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्यासाठी आणि अधिकाधिक भारतीयांना इंटरनेट उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनावर काम करू. त्याच वेळी, भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल म्हणाले की, दोन्ही कंपन्या नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या मदतीने भारतात डिजिटलायझेशनला गती देऊ इच्छित आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा