अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज

मुंबई, २४ जानेवारी २०२३: ‘दृश्यम २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केल्यावर पुन्हा एकदा अजय देवगण ‘भोला’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या समोर येत आहे. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘भोला’ चित्रपटाचा पहिला टिझर प्रदर्शित झाला. तो टीचर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आणि आता याच उत्सुकतेत भर घालणारा भोला चित्रपटाचा दुसरा टिझर अजय देवगनने समाजमाध्यमांद्वारे शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/CnyXZNUpFzd/?igshid=MDM4ZDc5MmU=

अजय देवगणची चित्रपटात असलेली दमदार ॲक्शन, लुक, बॅकग्राऊंड म्युझिक याची सगळ्याच चाहत्यांवर भुरळ पाडली आहे. या चित्रपटात अजय सोबत तब्बू देखील दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट ‘कॅथी’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे.

हा चित्रपट हिंदी भाषेत ३ डी मध्ये प्रदर्शित होणार असून स्वतः अजय देवगणने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये अजय देवगण बरोबरच तब्बू, संजय मिश्रा, दीपक डोबरिया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी रिलीज होत असून, या चित्रपटातील कलाकारांच्या कलाकृतीला प्रेक्षक कशी दाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा