सोशल डिस्टस्टिंगवरून अजित पवार मनसेच्या नगरसेवकावर भडकले

लोणी काळभोर, दि. ७ ऑगस्ट २०२०:  फिजिकल डिस्टस्टिंग ठेवण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे मनसेचे नगरसेवक सचीन चिखले यांच्यावर चांगलेच भडकले. आमचे चार मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आहेत, लांबून बोला असे खडेबोल सुनावले. यावरून सचिन चिखले यांनी सांगितले की, एव्हढीच जर काळजी होती तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवलाच कशाला, ऐकूणच घ्यायचं नव्हतं तर निमंत्रण दिलेच कशाला, असा सवाल आता नगरसेवक सचिन चिखले यांनी केला आहे. एवढंच नाही तर अजित पवारांच्या वर्तणुकीवरही नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी चिंचवड येथील जम्बो कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी आज शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली त्यावेळी हा प्रकार घडला. सध्या पिंपरी चिंचवड येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

या दौऱ्यात सेंटरची माहिती घेण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासनातील सुमारे ४० हून अधिक अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, सचिन चिखले यांनी जिम सुरू करण्याबाबत अजित पवार यांच्याशी संवाद साधत असताना हा प्रकार घडल्याने मनसेकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा