दिव्यांगांना तीनचाकी सायकलचं वाटप, अजित पवारांनी केली पाहणी

बारामती, ८ फेब्रुवरी २०२१: केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल दिव्यांगांना बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकलचं वाटप करण्यात आलं आहे. त्यावेळी अजित पवारांनी तब्बल २० ते २५ मिनिटे उपस्थित दिव्यांगांशी संवाद साधला.

आपल्या अनोख्या अंदाजासाठी अजित पवार ओळखले जातात. नियमांचं पालन व्हायला हवं यासाठी अजितदादा नेहमीच आग्रही असतात. यालाच अनुसरून काल यावेळी त्यांनी दिव्यांगांना देण्यात येणारी बॅटरीची सायकल चालवण्याबाबत सूचना केल्या. एवढंच नव्हे तर संबंधितांना सायकलची राईड घ्यायला लावत अजितदादांनी आपला वेगळा अंदाज दाखवून दिला. त्याशिवाय उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून या सायकलबद्दल माहिती घेतली. संबंधित लाभार्थ्यांना सायकल चालवण्याचं प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही केल्या.

एवढ्यावरच न थांबता रस्त्याच्या डाव्या बाजूने आपली सायकल कमीत कमी वेगात चालवा, असेही अजित पवारांनी सांगितले. सायकलचे ब्रेक, ग्रीप अशा सर्व बाबी दाखवून दिल्या. त्यानंतर अजितदादांनी लाभार्थ्यांना सायकलची राईड घेण्याबद्दल सांगत स्वतः त्यांना मार्गदर्शन केलं

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या वार्षिक सभेपूर्वी हा कार्यक्रम पार पडला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा