पुणे, १५ फेब्रुवरी २०२१: सध्या सर्व गोष्टी सुरळीत सुरू झाले आहेत. कोरोनाचा प्रभाव देखील आता कमी होताना दिसत आहे तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी देखील जनतेने संसर्गा बाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. परंतु, लोकांकडून आता मास्क घालने, शारीरिक अंतर ठेवणे यासारख्या गोष्टींकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचित करत असे म्हटले आहे की, जर नागरिकांनी असे वागणे कायम ठेवले तर आपल्याला याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. औरंगाबाद मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असे सूचक वक्तव्य केले.
थोडक्यात कोरोनासंदर्भात कडक निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात येण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहे. याबरोबरच आज मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार बैठक घेणार असून या बैठकीमध्ये कोरोनासंदर्भात कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.
कोरोना विषयावरून राजकारण करू नये
“काही लोक कोरोनाबाबत नाहक राजकारण करत आहेत. शिवजयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला, तर काही जणांनी शिवजयंतीला बंधन का आणता अशी टीका केली. पण कोरोना वाढतोय, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये,” असंही अजित पवार म्हणालेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे