अजित पवारांनी घेतला पुणे मेट्रोच्या कामकाजाचा आढावा…

पुणे, २५ सप्टेंबर २०२०: उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो (वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी करुन पुन्हा मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. या आठ दिवसातील मेट्रोची पाहणी करण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे. आज पहाटे सहा वाजताच त्यांनी भेट देऊन मेट्रोच्या कामकाजाची पाहणी केली. मेट्रोचं काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी यंत्रणेला दिल्या.

यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरु असलेल्या कामाबाबत सविस्तर माहीती दिली. तसेच मेट्रोच्या रेणू गेरा यांनी मेट्रो डेपो उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेन’नं प्रवास केला. शिवाजीनगर येथे बोगदा काम, व्हील पार्क येथील कचरा डेपोचं अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रुपांतर करण्यात आलंय. येथील कामाचीही उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली.

यापूर्वी १८ सप्टेंबरलाही अजित पवारांनी पहाटे-पहाटे पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी मेट्रोने संत तुकाराम नगर ते एचए कंपनीपर्यंत प्रवासही केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा