मुंबई: मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “अजित पवारांना भाजपकडून ब्लॅक मेल केले जात आहे. अजित पवार यांना कशाप्रकारे ब्लॅक मेल केले गेले याचा पूर्ण तपशील आमच्याकडे उपलब्ध आहे व तो ‘सामना’ मधून समोर येईल.” पुढे ते म्हणाले की, “अजित पवार राष्ट्रवादीमध्ये पुन्हा येऊ शकतात त्यांच्यावर दबाव आणल्यामुळे त्यांनी असे केले असावे”.
संजय राऊत यांना चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा विषयी प्रश्न विचारला असता त्यांनी असे म्हटले की, “चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावे ते शिवसेनेचे पक्षप्रमुख नाहीत त्यांनी काय विधान केले याचा मला फरक पडत नाही.” संजय राऊत यांनी शिवसेनेला संपवले त्यांनी आता तरी गप्प राहावे या पाटील यांच्या विधानाला उत्तर देत ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी आपला पक्ष बघावा. महाराष्ट्राचे सरकार स्थापन केले आहे हे पाप आहे महाराष्ट्रात रात्रीचे केवळ पाप केले जाते.
एकूणच सर्व घडामोडी बघता सत्ता स्थापनेतला पेज सुटल असला तरीही त्यामागील घडामोडी व अनिश्चितता अजूनही तशीच आहे. अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी कडे येतील का हा प्रश्न नव्याने उभा राहिला आहे.