अजित पवार यांचा पुण्यात बैठकांचा धडाका

पुणे : अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी पुण्यात बैठकांवर बैठका घेण्याचा धडाका सुरू केला आहे. पुणे महापालिका, पिंपरी – चिंचवड महापालिकेसह पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पवार यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ होताना दिसत आहे.
मेट्रो, ‘पीएमआरडीए’, अशा अनेक मोठ्या प्रकल्पांचा ते सातत्याने आढावा घेत आहे.

पुणे शहराच्या चारही बाजूंनी मेट्रोला मागणी वाढली आहे. पण, शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केवळ मेट्रो हा उपाय नाही. त्यासाठी ‘पीएमपीपीएमएल’ च्या बसेसही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावण्याची गरज आहे.

आगामी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी अजित पवार यांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावणे सुरू केले आहे. पुणे शहरात भाजपची मोठी ताकद आहे. खासदार गिरीश बापट, राज्यसभेचे खासदार संजय काकडे, माजी खासदार अनिल शिरोळे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मानणारा भाजपमध्ये मोठा वर्ग आहे. महापालिकेत भाजपचे तब्बल ९८ नगरसेवक आहेत. आगामी महापालिकेची निवडणूक वार्डपद्धतीने होणार असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी, काँगेस, शिवसेना, मनसेला होणार असल्याचे बोलले जात आहे. तर, भाजपला तोटा होणार असल्याची चर्चा आहे. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने ४ चा प्रभाग केला होता. ‘मिनी आमदारकी’ सारखी ही निवडणूक झाली. त्यातच मोदी लाट कायम असल्याने भाजपला फायदा झाला आणि २०१७ मध्ये भाजपची एक हाती सत्ता आली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा