नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या आरोपावरून शनिवारी (दि.१८) रोजी रात्री अटक करण्यात आली. अहमदाबादच्या विरमगाव येथून त्यांना अटक करण्यात आली आहे.
गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अहमदाबादमध्ये २०१५ साली काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान हिंसाचार उसळला होता. यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या प्रकरणात हिंसाचाराला चिथावणी दिल्याप्रकरणी पटेल यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता.
या प्रकरणातील खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात अहमदाबादच्या न्यायालयाने रविवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.