पुणे : अवघ्या देशाच्या राजकीय इतिहासात खळबळ उडवून देणारी घटना आज महाराष्ट्रात घडली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने सर्वच स्थरातून आता प्रतिक्रया उमटू लागल्या आहेत. अजित पवार यांच्या आशा वागण्याने राजकीय वातावरण मलिन झाल्याच्या चर्चा आता होऊ लागल्या आहेत.
महाराष्ट्रात याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहेत. काही ठिकाणी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येत आहे.
अजित पवार मुर्दाबाद, वाय बी सेंटरबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पाहायला मिळाली. अजित पवारांनी गद्दारी केली, अजित पवारांवर कारवाई केली जावी, उदयनराजेंचे जे हाल झालेत तसंच अजितदादांचे होणार, वाय बी सेंटरवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले तसेच अशी घोषणाबाजी केली. याबाबत राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.