अजित पवारांच्या अडचणीत वाढ ; विधिमंडळ नेते पदी जयंत पाटीलच

मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे. कारण विधीमंडळाच्या सचिवालयातील कार्यालयीन नोंदीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे. त्यामुळे त्यांना व्हिप बजावण्याचा अधिकार असल्याची माहिती सचिवालयातील अधिकाऱ्याने दिली आहे.

३० ऑक्टोबरला अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. ही माहिती मीडियातून मिळाली. मात्र, त्याबाबत विधिमंडळाच्या सचिवालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. तर अजित पवारांना हटवून जयंत पाटील यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीने सचिवालयाला दिले असून तशी नोंदही करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपच्या काही नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. आमच्यासोबत राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. अजित पवार हे गटनेते म्हणून निवडले गेले आहेत. त्यांनाच पक्षाचा व्हिप बजवाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदार अजित पवारांच्या बाजुने आपला हक्क बजावतील. मात्र, नव्या माहितीनुसार अजित पवार हे विधीमंडळ नेते नसल्याचे पुढे आले आहे.
त्यामुळे भाजपकडून करण्यात येणारा दावा फोल ठरला आहे. तसेच अजित पवार यांना आता कोणतेही अधिकार नसल्याने ते व्हिप बजावू शकत नाहीत. राष्ट्रवादीचे अधिकृत विधिमंडळ नेते हे जयंत पाटील आहेत, हे विधिमंडळाच्या सचिवालयात लेखी नोंद असल्याने त्यांनाच व्हिपचा अधिकार राहणार आहे. त्यामुळे अजित पवार आणि भाजपच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा