अजित पवारांचे ‘वर्षा”वर खलबत

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये जवळपास ४५ मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार पुन्हा आपल्या निवासस्थानी रवाना झाले.अशी माहिती सूत्रांनी दिली.

अजित पवार यांनी रात्री वर्षा बंगल्यावर मंत्रिपदाच्या वाटाघाटीसाठी आल्याचे बोलले जात आहे. याशिवाय त्यांनी मंत्रीपदाबाबत जात आहे. यासंदर्भात वर्षा बंगल्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची माहिती आहे.

अजित पवार जवळपास १0.१५ वाजता मुंबईतील घरातून बाहेर पडले. यानंतर जवळपास २० मिनिटानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्या दोघांमध्ये जवळपास ४५ मिनिटे चर्चा झाली.
दरम्यान, सर्व घडामोडींनतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत ट्विटवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा