गोल पोस्ट राजकारण अजित पवारांनी सह्यांचा गैरवापर केला: मलिक

अजित पवारांनी सह्यांचा गैरवापर केला: मलिक

मुंबई : अजित पवारांच्या या निर्णयाने महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.आमदारांच्या सह्यांचा अजित पवार यांनी गैरवापर केला. असे राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
नवाब मलिक म्हणाले कि, अजित पवार यांच्यासोबत शपथविधीला गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यांना फसवून तिथे नेण्यात आले असल्याचे आमदारांनी पवारांना सांगितले.

अजित पवार यांनी उपस्थितीसाठी आमदारांकडून सह्या घेतल्या होत्या. परंतु शपथ घेण्याच्या आधारे त्याचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी अजित पवारांवर केला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version