गोल पोस्ट महाराष्ट्र मनसेच्या एकमेव आमदाराची प्रतिक्रिया

मनसेच्या एकमेव आमदाराची प्रतिक्रिया

मुंबई: सत्तास्थापनेसाठी शुक्रवार रात्रीपर्यंत महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू होत्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. तोवर सर्वकाही महाविकास आघाडीच्या बाजूने सुरू असल्याचेच चित्र होते. मात्र अजित पवार यांनी रात्रीतून भाजपाशी संधान साधले आणि महाविकास आघाडीच्या सत्तेच्या आशाच धुळीस मिळाल्या.
मात्र या सर्व घडामोडींवर आजच्या शपथविधीनंतर राजू पाटील यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ‘मनसे शुभेच्छा’ दिल्या आहेत. राजू यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन “महाराष्ट्रात नविन व स्थिर सरकार स्थापन होवो! मनसे शुभेच्छा!”, असं ट्विट केलं आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version