निर्व्यसनी रहा व्यायाम करण्याचा अजित पवार यांचा सल्ला

10
बारामती २३ जानेवारी २०२१ : आज बारामती येथील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात सुरू असलेल्या विविध विकासकाम करत असताना नागरिकांना काही अडचणी आल्यास शासनाला सहकार्य करा कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही शहरातील कोणत्याही घटकाला वंचित ठेवणार नसल्याची शंभर टक्के खात्री देतो असे म्हणाले तर प्रत्येकाने रोज व्यायायम करावा व निर्व्यसनी राहण्याचा सल्ला देखील अजित पवार यांनी उपस्थितांना दिला.
बारामती शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या बाबतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुका व शहरात सुरू असलेल्या विकास कामाची माहिती दिली यामध्ये शहरातील निराडावा कालवा, रस्ते, पुलांची कामे सुरू आहेत.शहरातील सर्व्हिस रस्त्यांची कामे सुरु आहेत.जर कामच्याबाबतीत कोणाच्या मनात चांगल्या कल्पना ,सुधारणा असतील तर सांगा कान्हेरी परिसरात फुलपाखरू पार्क ,बोटिंग ,तांदुळवाडी गावाच्या परिसतात वन्यप्राणी संग्रहालय आहे.पालखी महामार्गाचे काम अंतिम टप्यात असून नीरा व कऱ्हा नदीवरील पुल, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय,शहरातील बस स्थानक हे राज्यातील पहिल्या पाच मधील असेल जुनी भाजी मंडई येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स, वसंतराव पवार नाट्यगृह, ओडोटोरियाम, थिएटर,प्रत्येक घरात गॅस कनेक्शन येणार आहे.तर शहरातील कचरा डेपो लवकरच हलवणार असुन जमा होणाऱ्या कचऱ्यावर नवीन प्रयोग करून त्याची विल्हेवाट लावली जाईल,सुपे गावात वेगळे पोलीस स्टेशन कऱ्हाटी मध्ये शैक्षणिक संकुल,कॉलेज,इंग्लिश मिडीयम सकूल,शहरात नवीन चार उद्यान विकास काम सुरू असताना जर कोणाची जागा जात असेल तर नाराज होऊ नका सहकार्य करा ,शहरातील काही श्रद्धास्थान येथे नाईलाजाने काम करावे लागते कोणीही गैरसमज करू नका शहरातील कोणाही घटकाला वंचित ठेवणार नाही याची शंभर टक्के खात्री देतो असे पवार म्हणाले कान्हेरी येथील शिवसृष्टी, रोपवाटिका, सिरसाई जनाई कॅनॉल सर्व चाऱ्या यासाठी बैठक घेतली आहे.उन्हाळ्यात देखील सर्वांना पाणी मिळेल पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही अशा सूचना जिल्हापरिषद व पंचायत समितीला दिल्या असल्याचे पवार यांनी बोलताना सांगितले.
सुरू असलेल्या कामे दर्जेदार होत आहेत का यावर नागरिकांनी लक्ष द्यावे कुठे काम खराब होत असेल तर सांगा.इरिकेशन जवळ होणाऱ्या मोठ्या तलावामुळे दुष्काळ पडला तरी शहराला पाणी कमी पडणार नाही तर प्रत्येकाला शहर आपले व सुरक्षित असल्याची भावना असावी असे पवार यांनी संगीतले.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव