इस्लामपूर, २८ नोव्हेंबर २०२२ : ‘ए. वाय. आपलं ठरलंय, व्यासपीठापुरतं मर्यादित राहायचं; इकडं-तिकडं फिरायचं नाही.’ असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना इस्लामपूर येथे दिला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे ज्येष्ठ पुत्र प्रतीक यांच्या विवाह सोहळ्यासाठी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार छगन भुजबळ असे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पवार यांची भेट घेतली.
पाटील हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. तोच मुद्दा पकडून पवार यांनी पाटील यांना इकडं-तिकडं जायचं नाही, व्यासपीठापुरतं मर्यादित राहायचं, असे सांगितले. पहिल्या रांगेत बसलेल्या अजित पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून अनेक राजकीय मंडळी आली होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर