मुंबई, 4 जुलै 2022:आता आम्ही बोलतो , असं म्हणत अजीत पवारांनी शांतपणे पण टोलेबाजी सुरु केली. खोचक पण मार्मिक अशी टोलेबाजी यावेळी अजित पवारांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. पण जेव्हा १०६ आमदार बरोबर असताना केवळ ४० आमदारांच्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले . यात नक्कीच काळबेरं आहे, हे नमूद केलं. तसेच आजपर्यंतचा इतिहास आहे की , बंडखोर नेते निवडून येत नाही. हे सत्य आहे. त्यांचा तुम्ही नक्की विचार करा. हे ही त्यांना सांगण्यात आले. शिंद्याची जर पात्रता होती , मग त्यांना एकच खाते का दिल? असा सवाल त्यांनी शिंदेना विचारला.
फडणवीसांवर त्यांनी मात्र खुली टीका केली. त्यात खास करुन तुमचा जोश आता चेहऱ्यावर दिसत नाही हे ठणकावून सांगितलं. पण तुमचं कौतुक आहे . अडीच वर्षात तुम्ही तीन मंत्रीपद भूषवली. मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता आणि आता उपमुख्यमंत्री हे पद भूषवताना तोच जोश दिसत नाही. याचा मात्र विचार कराल.
सुरत, गुहाटी, गोवा आणि मुंबई अशा प्रवास १० दिवसात आमदारांनी केला . निधी मिळाला नाही, आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. हा आरोप आम्हाला मान्य नाही. असं म्हणून अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले . पण यात खोच आणि मर्म दोन्हींचा नक्कीच उपयोग त्यांनी केला हे खरं ..
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस