…अखेर नीरव मोदी फरार घोषित

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याला विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे.
१४ जानेवारीपर्यंत न्यायालयासमोर हजर राहावे, अन्यथा नीरव मोदीला फरारी गुन्हेगार घोषित केले जाईल, असा इशारा न्यायालयाने दिला होता.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.सी.बर्डे यांनी नीरव मोदी याच्यासह त्याचा भाऊ नीशल व सहकारी सुभाष परब या आरोपींनाही हा इशारा दिला होता.
नीरव मोदी व मेहुल चोक्सी दोघेही पळून गेले आहेत. मोदीला लंडन पोलिसांनी अटक केली असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया प्रलंबित आहे.
१४ हजार कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळा प्रकरणात नीरव मोदी, त्याचा भाऊ व सुभाष परब हे तिघेही आरोपी आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा