सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना “क्लीन चिट”

नागपूर: महाविकास आघाडीची सत्ता येताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल केले आहे. अजित पवार यांच्याविरुद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नसल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.
नव्या सरकारमध्ये अजित पवारांच्या वाट्याला कोणते मंत्रिपद येणार हे अद्याप स्पष्ट नसलं, तरी आधीच्या सरकारमध्ये असताना लागलेले सिंचन घोटाळ्याचे डाग मात्र धुतले गेले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा