अखेर राजगर्जना कडाडली

संभाजीनगर १ मे २०२२ : महाराष्ट्र दिनाची संध्याकाळ अतिशय वेगळी होती. निमित्त होते संभाजीनगर मधल्या राज ठाकरे यांच्या सभेचे…
ही सभा म्हणजे केवळ टीकास्त्रांचे लक्ष म्हणून तर गाजली. पण ही सभा कोणाला लक्ष्य करणार याकडे सगळ्यांनी कान टवकारले होते.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत राज ठाकरेंनी टीकेला सुरुवात केली. जे महाराष्ट्राचा इतिहास विसरले त्यांच्या जमिनीखालचा भूगोल सटकला हे नक्की. असं म्हणत राज्यात सगळीकडे सभा घेणार असं राज यांनी जाहीर करुन टाकलं.

सुरुवात करतांना राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर तोफ डागली. राष्ट्रवादी कायम जातीयवादाचं राजकारण करतात. ते नास्तिक आहेत हे मी नाही सांगत, तुमची कन्या लोकसभेत बोलली आहे. असं म्हणत त्यांनी पवार यांच्यावर विष पसरवण्याचा आरोप केला.
पवारांनी केवळ पाहिजे तेवढंच न वाचता संदर्भा सहित पुस्तकं वाचण्याचा तसेच प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तके वाचण्याचा खोचक सल्लादेखील त्यांनी पवारांना दिला.

जेम्स लेन च्या वृत्तपत्रातील मुलाखतीचा भाग दाखवत पवारांनी राजकीय फायद्यासाठी असे वाद उकरुन काढले. बोलताना शाहू फुले आंबेडकर यांच्या नावानी कायम बोलायला सुरुवात करणारे पवार हे विसरतात की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचा आहे. याची आठवण करुन दिली.

लाऊडस्पीकर हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय असल्याचं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सगळे भोंगे हे अनधिकृत आहेत. तेव्हा ३ मे नंतर लक्षात ठेवा. दर यूपीत निर्णय लागू होतो तर महाराष्ट्रात का नाही? विनंती करुन समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटातील हिसका दाखवला पाहिजे. मंदिरावरील भोंगे उतरले पाहिजे पण मशिदीवरचे भोंगे उतरल्यावरच. असा इशारा त्यांनी दिला.

राष्ट्रवादीवर जातीपातीच राजकारण करण्याचा ठोस आरोप त्यांनी केला. तर जिथे भोंगे अजान लावली जाईल आणि भोंगा उतरला नाही तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजलीच पाहिजे.
यावेळी शाहिर साबळे यांच्यावर येणाऱ्या चित्रपटाच्या टीझरचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रपटाचे दिग्दर्शन शाहीर साबळेंचा नातू केदार शिंदे करणार असून शाहीर साबळेंच्या प्रमुख भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी दिसणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला २८ एप्रिल २०२३ ला येणार आहे.

माननीय शरद पवार आणि भोंगे या मुद्द्यांना हात घालून सगळ्यांना चेतावनी दिली असच म्हणावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा