अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून वारजे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

पुणे, दि.२३ मे २०२०: वारजे येथील अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने वारजे पोलीस स्टेशन येथे १५०- २०० पोलिसांना सामाजिक बांधीलकीतून मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले ते राहुल पार्क सोसायटीमधील लहान मुलांनी पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी तयार केलेली शुभेच्छा कार्ड. पोलिसांच्या वतीने वरिष्ठ पोलीस अधीक्षक अशोक कदम यांच्याकडे या सर्व गोष्टी सुपूर्त करण्यात आल्या.

कोरोनाच्या काळात पोलिसांवरील वाढता अतिरिक्त कामाचा ताण लक्षात घेता महासंघाकडून पोलिसांकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

यावेळी कदम यांनी सांगितले की, लॉकडाऊन नंतरच्या काळातही नागरिकांकडून संयम, सतर्कता आणि
सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे कदम यांनी सांगितले.

महासंघातर्फे जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी यांनी याबाबत जनजागृती करण्याचे आश्वासन दिले. पोलीसांबाबत त्यांच्या या कार्याला कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाला महासंघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी, श्रीकांत देशपांडे, शिल्पा महाजनी, मनीष जोशी, शेखर देशपांडे , दीपक महाजनी, हेमंत कासखेडीकर, ऋषिकेश कुलकर्णी आदी सभासद उपस्थित होते.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वारजे शाखा व जिल्हा पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कोथरूड शाखा अध्यक्ष माधव तिळगुळकर यांच्याकडून मोफत मास्क देण्यात आले. तसेच कॅनडा येथील अनिवासीय भारतीयाकडून आर्थिक मदत मिळवण्यात
आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा