गोल पोस्ट महाराष्ट्र अकोला जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

अकोला जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

अकोला: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
यावेळी त्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापासून थांबवण्यात आले. त्यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्याविरोधात एकच घोषणाबाजी केली. आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा निषेध केला.

error: Content is protected !!
Exit mobile version