महाबळेश्वर, जावळी, वाई आणि पाटण तालुक्याला सतर्कतेच्या सूचना : जिल्हाधिकारी

सातारा, दि.३ जून २०२०: हवामान विभागाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात कोकण विभागात अरबी समुद्र किनाऱ्यावर १ ते ४ जून कालावधीत निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याबाबत हवामान खात्याने इशारा दिला आहे. या वादळाचा परिणाम सातारा जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरुन तसेच महाबळेश्वर, जावळी, वाई आणि पाटण या तालुक्याला विशेष सतर्क राहावे.या बाबत सर्व विभागांनी सतर्क राहून आपल्या विभागाशी सर्व त्या उपाययोजना राबविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

संभाव्य ‘निसर्ग’ या वादळाचा परिणाम सातारा जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे संभाव्य अतिवृष्टी, वादळ-वारे होऊन झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड होणे, विद्यूत खांब, तारांचे नुकसान होणे, वीज पूरवठा खंडीत होणे, संपर्क यंत्रणा खंडीत होणे, वाऱ्यांमुळे घरांची पडझड किंवा इतर बाबींचे नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरुन सर्व विभागांनी सतर्क राहून आपल्या विभागाशी सर्व त्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.

विशेषत: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून देण्यात आल्या आहेत

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा