गोल पोस्ट महाराष्ट्र राज्यात ई टोकनवर मिळणार दारू

राज्यात ई टोकनवर मिळणार दारू

मुंबई, दि.१२ मे २०२० : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई टोकन सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे आता मद्यप्रेमींना टोकनवर दारू मिळणार आहे.

वाईन शॉप बाहेर होणाऱ्या गर्दीपासून सुटका व्हावी आणि कोव्हिड १९ रोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी ही ई – टोकन सुविधा सुरु करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.

नागरिकांना ई टोकनची सुविधा www. mahaexcise. com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना दारु खरेदी करायचे आहे, अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून ई-टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव नमूद करायचे आहे.

त्यानंतर आपला जिल्हा व पिनकोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे.

संकेतस्थळावर माहिती सबमिट केल्यानंतर त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणाऱ्या वाईन शॉपची यादी दिसेल. त्या दुकानांपैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकाला करता येईल. आवश्यक माहिती नमुद केल्यानंतर ग्राहकास ई – टोकन मिळेल. सदर टोकनद्वारे ग्राहक आपल्या सोयीच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून दारू खरेदी करु शकणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version