गोल पोस्ट आरोग्य ‘स्टार इंडिया’ कडून पोलिसांना १० हजार पीपीई कीटची भेट

‘स्टार इंडिया’ कडून पोलिसांना १० हजार पीपीई कीटची भेट

मुंबई, दि. १२ मे २०२०: पोलीस कर्मचारी अहोरात्र नागरिकांची सेवा करत आहेत. प्रशासन व सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाही. अशातच पोलिसांना देखील कोविड-१९ ची लागण होत आहे. आत्ता पर्यंत ७ पोलिसांना आपले जीव देखील गमवावे लागले आहे. या स्थितीत त्यांचे संरक्षण करण्यासाठी उदय शंकर आणि शिशिर जोशी यांनी पोलिसांना पीपीई कीट देऊ केले आहे.

पोलिसांचे कोरोना विषाणू पासून संरक्षण होण्यासाठी स्टार इंडिया, डिस्ने व हॉटस्टारचे चेअरमन उदय शंकर आणि प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी खाकी रंगाच्या १० हजार पीपीई कीटची मदत केली आहे.

कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी पोलीस विभागाला हे कीट निश्चितच अतिशय महत्त्वपूर्ण ठरतील. आतापर्यंत मिळालेली ही सर्वात मोठी भेट आहे. याबद्दल गृह विभागाच्या वतीने स्टार इंडिया व प्रोजेक्ट मुंबईचे आभार मानण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version