नाशिक येथे महंतांना मद्यपींची मारहाण

नाशिक, दि.१८ मे २०२०: लॉकडाऊन असताना सुद्धा नाशिकमध्ये मद्यपींचा हैदोस सुरुच आहे. रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने गाडी चालवणे, रस्त्यावर धिंगाणा घालणे तसेच मारहाणीचे प्रकार देखील वाढले आहेत.मात्र नाशिकच्या तपोवन परिसरात काही मद्यपींनी मंदिराच्या एका महंताला मारहाण केल्याने या मद्यपींचा आणि गावगुंडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

नाशिकचा पवित्र समजला जाणारा परिसर आणि ज्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यातील देशभरातील साधू महंत वास्तव्य करतात, तो तपोवन परिसर सध्या मद्यपी आणि गुंडांचा अड्डा बनला आहे. लॉकडाऊन काळात देखील तपोवन परिसरात दारु पिऊन धिंगाणा घालणे, परिसरातील रहिवाशांना शिविगाळ करणे, धमकावणे हे प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. त्यातच तपोवनातील साक्षी गोपाल मंदीराच्या महंतांनाच या मद्यपिंनी मारहाण करत दगडफेक केल्याची घटना घडल्याने या मद्यपींच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याप्रकरणी महंतांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अनेकदा तक्रारी करुन देखील पोलीसांची गस्त वाढत नसल्याने मद्यपींचा परिसरातील धोका वाढत चालला आहे. या पुर्वीच पोलीसांनी कठोर भुमिका घेतली असती तर गुंडांची ताकद वाढली नसती असे नागरिकांचे म्हणणे आहे या प्रकरणी पोलीसांनी चौकशी सुरु केली असुन गस्त वाढवण्याची देखील ग्वाही दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा