नवी दिल्ली, १ जुलै २०२३ : एखाद्या चित्रपटात उडणाऱ्या कारला तुम्ही बघितल असेल, पण आता ही हवेत उडणारी कार तुम्ही वास्तवात बघणार आहात. येवढेच नाही तर तुम्ही देखील या उडणाऱ्या कारमध्ये (Flying Car) प्रवास करु शकणार आहात. अमेरिकेत सरकारने नुकतेच एका करारात अलेफ एअरोनॉटिक्स या कंपनीच्या उडणाऱ्या कारला अधिकृत परवानगी दिलीय. या उडणाऱ्या कारला अमेरिकेतील सरकारने परवानगी दिल्याने हा ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. जगासमोर पहिल्यांदाच उडणारी कार सर्वांसमोर येणार आहे.
अलेफ एअरोनॉटिक्स कंपनीने या उडणाऱ्या कारचं नाव ‘मॉडेल ए’ असं ठेवल आहे. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) या गाडीला ‘स्पेशल एअरवर्थीनेस’ सर्टिफिकेशन दिलंय. अशा प्रकारच्या वाहनाला मंजूरी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.अलेफ एअरोनॉटिक्स कंपनीने दावा केला आहे की, ही ‘मॉडेल ए’ कार हवेत आणि रस्त्यावर देखील चालणार आहे.
कंपनीने इलेक्ट्रॉनिक स्वरुपाची ही कार असल्याचे सांगितलय. रस्त्यावर ट्रॉफिक असेल तर ही कार तुम्ही हवेत उडवू शकता. रस्त्यावर ही कार ३२२ किमी ची रेंज, तर हवेत चालवताना १७७ किमी रेंजने जाईल असे कंपनीने सांगितले आहे. माहितीनुसार ह्या कारमध्ये किमान २ व्यक्ती बसू शकतात. ह्या कारची किंमत ३,००,००० डॉर्लस इतकी असेल म्हणजेच भारतीय चलनात तीची २४६,२४६.१६ एवढी किंमत असणार आहे. अलेफ एअरोनॉटिक्स कंपनीने जागतिक बाजारात ही फ्लाईंग कार कधी लाँच करणार याची अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे