अमेरिकन यूट्यूबरने बनवला ८ फूट उंचीचा iPhone

नवी दिल्ली, १ जुलै २०२३ : जगात सध्या आयफोनची एक वेगळीच क्रेझ बघायला मिळतेय, आजपर्यंत अनेक आयफोन बघितले असतील पण ८ फूट उंचीचा, माणसाच्या उंचीपेक्षाही मोठा आयफोन बघितला नाही. सध्या सोशल मीडियावर जगातल्या या सगळ्यात मोठ्या आयफोनचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतोय. अमेरिकन यूट्यूबरने ८ फूट उंचीचा सर्वात मोठा आयफोन बनवला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा ८ फुटाचा सर्वात मोठा आयफोन फक्त शोभेसाठी नाही तर हा मोठा आयफोन सर्वसाधारण आयफोनप्रमाणे व्यवस्थित काम करतो. याचा व्हिडिओ यूट्यूबवर वेगाने व्हायरल होत आहे.

अमेरिकन यूट्यूबर मॅथ्यू बीमने ८ फूट उंचीचा, सर्वात महागड्या फोन iPhone 14 Pro Max चं मॉडेल बनवल आहे. YouTuber मॅथ्यू बीमने हा फोन एका कारवर ठेवला आणि त्याचे फिचर्स आणि रिव्ह्यू पाहण्यासाठी तो न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर नेला. या डिव्हाइसच्या डिस्प्लेसाठी टीव्ही टच-स्क्रीनचा वापर करून मॉडेल तयार करण्यात आलं आणि हा फोन मॅक-मिनीला जोडण्यात आलाय.

मॅथ्यू बीमने या मोठ्या आयफोनमध्ये गाणी ऐकताना व्हॉल्यूम कमी जास्त करण्यासाठी बटणंही बसवली आहेत. तसेच मॅथ्यू बीमने त्याच्या यू-ट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये, एवढा मोठा आयफोन बनवण्याची सगळी प्रक्रिया देखील शेअर केलीय. त्यांनी सांगितलं की, पहिले मजबूत धातूची फ्रेम तयार करण्यात आली यामुळे हा आयफोन बनवण्यात मदत झाली. नंतर iPhone डिव्हाइसला मॅट फिनिश केल्याचं देखील दिसत आहे. या सर्वात मोठ्या आयफोनमध्ये साधारण आयफोनमधील सर्व फीचर्स नाहीत, पण हा फोन तयार करताना टीव्हीचा टच स्क्रिन वापरण्यात आला असुन याला मिनी-मॅक जोडण्यात आला आहे.

अमेरिकन यूट्यूबवर मॅथ्यू बीमने याचा रिव्हयू करताना, आयफोनवर व्हिडीओ गेम खेळून दाखवला, या ८ फूट फोन मधून त्याने फोटो काढले इतकंच नाही तर भारतातील एका मित्रासोबत व्हिडिओ कॉलवरून संवादही साधला. सध्या हा ८ फूट आकाराच्या आयफोननं सर्वांचं लक्ष वेधून घेतोय आणि सोशल मीडिया वर वायरल होतोय.

न्यूज अनकट प्रतिनीधि : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा