कीव (युक्रेन), २ जानेवारी २०२३ : युक्रेनची राजधानी कीवमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. रशियाने सलग दुसऱ्या रात्री ड्रोनद्वारे शहरावर जोरदार हल्ले केले आहेत. सोमवारी पहाटेचा हल्ला रशियाने नवीन वर्षाच्या हल्ल्यानंतर केला आहे, ज्यामध्ये कीव व इतर शहरे क्षेपणास्त्रे आणि इराण निर्मित ड्रोनच्या आगीखाली आहेत. सोमवारी पहाटे ड्रोन हल्ल्यांनी कीव आणि आसपासच्या प्रदेशांतील गंभीर पायाभूत सुविधांना लक्ष्य केले.
शनिवारी (ता. ३१) कीव आणि इतर शहरांमध्ये झालेल्या हल्ल्यात किमान तीन लोक ठार झाले. तर झापोरिझियाच्या दक्षिणेकडील भागात झालेल्या हल्ल्यात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले, की शहराच्या ईशान्येकडील डेस्नियान्स्की जिल्ह्यातील एका इमारतीला नष्ट झालेल्या ड्रोनच्या ढिगाऱ्यामुळे एकजण जखमी झाला आहे.
सोमवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे १ ते ३ वाजेपर्यंत, युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने कीवच्या वरच्या १६ हवाई वस्तू नष्ट केल्या. तोपर्यंत तीन तासांहून अधिक काळ हवाई हल्ल्याचे सायरन वाजत होते. देशाच्या पूर्वेकडील युक्रेनच्या प्रादेशिक लष्करी कमांडने सांगितले, की हवाई संरक्षण यंत्रणेने सोमवारी पहाटे निप्रॉपेट्रोव्हस्क आणि झापोरिझिया प्रदेशांवर इराणी बनावटीचे नऊ ड्रोन नष्ट केले.
दरम्यान, रविवारी रात्री एका व्हिडिओ संबोधनात, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी त्यांच्या नागरिकांच्या एकतेच्या, सत्यतेच्या आणि स्वतःच्या जीवनाच्या भावनेचे कौतुक केले. वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले, की रशिया युक्रेनपासून एकही वर्षे स्वातंत्र्य हिरावून घेणार नाही. आम्ही त्यांना काहीही देणार नाही. ड्रोन्स, क्षेपणास्त्रे, इतर सर्व काही त्यांना मदत करणार नाही. कारण आम्ही एकजुटीने उभे आहोत. ते फक्त भीतीने एकत्र आले आहेत. रशियाने शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे उजाडण्यापूर्वी युक्रेनियनचे ४५ इराण निर्मित स्फोटक ड्रोन पाडले. इराणने रशियाला शस्त्रे पुरविण्यास नकार दिल्याचे वृत्त अल जझीराने दिले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड